Last Updated: Thursday, November 29, 2012, 16:29
www.24taas.com, मुंबई ‘इलू इलू’ गर्ल मनिषा कोईराला हिला कँसर असल्याचं निदान झालंय. ती सध्या मुंबईतील जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.
तब्येत अचानक बिघडल्यानं तीन दिवसांपूर्वी मनिषाला जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथंच तिच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक टेस्ट झाल्यानंतर मनिषाला कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलंय.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला मनिषा नेपाळमध्ये होती. पण, तब्येत बिघडल्यानं तीनं तात्काळ मुंबईकडे धाव घेतली. यावेळी तिच्यासोबत तिची आई सुषमा होती. तिच्यावर जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू झाल्यानंतर तिचे वडील प्रकाश आणि भाऊ सिद्धार्थ हेही मुंबईत दाखल झालेत.
मनिषाच्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या माहितीनुसार, आपल्या आजाराबद्दल मनिषाला कल्पना असून तीनं ही गोष्ट सकारात्मक दृष्टीनं घेतलीय.
First Published: Thursday, November 29, 2012, 16:26