Last Updated: Tuesday, July 30, 2013, 09:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रसिकांच्या ह्रदयात आदराचं स्थान मिळवणारे मोजके ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यात अभिनेत्री सुलोचनादीदी आहेत. आपल्या जिवंत अभिनयानं त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. दीदींचा आज ८५ वा वाढदिवस आहे. सिनेजगतामधील ७० वर्षांच्या दिर्घ कारकिर्दीत त्यांनी तब्बल ४५० चित्रपटांमध्ये काम केलंय. भारत सरकारच्य़ा पद्म पुरस्कारानंही त्यांचा गौरव करण्यात आलाय. राज्य सरकारच्या आणि अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा सन्मान करण्यात आलाय.
झी २४ तासच्या `कृतज्ञ आम्ही` या विशेष उपक्रमांतर्गंत सुलोचनादिदींना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, July 30, 2013, 09:35