आफताब शिवदासानी गुपचूप विवाहबद्ध ,Aftab got married with his girlfriend Nin dusanj

आफताब शिवदासानी विवाहबंधनात अडकला

आफताब शिवदासानी विवाहबंधनात अडकला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई


अभिनेता आफताब शिवदासानी आपली गर्लफ्रेंड निन दुसांझ हिच्यासोबत विवाहबद्ध झालाय. या दोघांनी नक्की केव्हा लग्न केलं हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, सध्या दोघेही हनीमूनला गेल्याचं समजतंय.

आफताब आणि निन दोघांची ओळख कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये झाली होती. निन हाँगकाँग मधल्या एका ‘लक्झरी ब्रॅन्ड’ची सल्लागार होती. नीन ही एकेकाळी कबीर बेदीची गर्लफ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परवीन दुसांझ हिची छोटी बहीन आहे. २०१२ पासून ती भारतात राहायला आली.

आफताब आणि निन यांना त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीने म्हणजेच रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा-देशमुख यांनी लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.






लग्नासाठी दोन्ही परिवारातील कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मैत्रिण हजर होते. हनिमूनहून परत आल्यानंतर आफताब आपल्या फिल्मी दुनियातील मित्र-मैत्रिणींना एक रिसेप्शन पार्टी देणार आहे.


यापूर्वी आफताबचे आमना शरीफ हिच्याशी प्रेमसंबंध चर्चेत होते. तेव्हा दोघांनी आलू चाट, आओ विश करे या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014, 17:02


comments powered by Disqus