...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!, After producer Boney Kapoor, Karan Johar threatened by gangster

...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!

...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्याला धमकी मिळालीय... हा निर्माता-दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून करण जोहर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करणला अज्ञात व्यक्तींकडून एका फोन नंबरवरून ‘एसएमएस’ पाठवून धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. करण जोहरनं याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केलीय. त्यानंतर पोलिसांनी करण जोहरच्या सुरक्षेत वाढ केलीय. मुंबई क्राईम ब्रान्च या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खार पोलीस स्टेशनमध्ये करण जोहरनं याबद्दल तक्रार नोंदवलीय. एसएमएसमार्फत करणकडे पैशांची मागणी केली गेलीय. पैसे मिळाले नाहीत तर त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा अशीदेखील यामध्ये धमकी दिली गेलीय.

काही दिवसांपूर्वी निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांनाही याच पद्धतीनं धमकी देण्यात आली होती. याबद्दलही पोलिसांकडे तक्रार दाखल झालेली आहे. त्यानंतर बोनी कपूर यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरविली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 6, 2013, 15:38


comments powered by Disqus