Last Updated: Saturday, May 24, 2014, 08:47
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचं सौंदर्य ऐश्वर्या राय बच्चन हिनं पती अभिषेक बच्चनसोबत शुक्रवारी कान्स फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या ‘एम्फएर’ सोहळ्याला हजेरी लावलीय.
40 वर्षीय ऐश्वर्या राय यावेळी गाऊनमध्ये खुपच सुरेख दिसत होती. ओठांवर लाल रंगाचं लिपलायनर तिनं लावलेलं होतं. डोळ्यांमध्ये काजळ आणि खुले केस अशा दिलखेचक रुपात ती इथं आपल्या पतीसोबत अवतरली होती.
यावेळी अभिषेकनं काळ्या रंगाचा बंद गळ्याचा कोट परिधान केला होता. ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांसोबत खुपच खूश दिसत होते.
हा सोहळा फ्रेंच रिवेराच्या हॉटेल ‘डू कॅप एडेन रॉक’मध्ये झाला. यामध्ये मॉडेल नताशा पोली, बारबरा पलवीन, बियांसा बालटी, लारा स्टोन, जेन फोंडा हेदेखील सहभागी झाले होते.
ऐश्वर्या नियमितपणे कान्सला हजेरी लावताना दिसते. ‘लॉरियल पेरिस’ची ती ब्रँन्ड अॅम्बेसेडर आहे. यंदा या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तिला मिळालेली ही 13 वी संधी होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 24, 2014, 08:47