अभिषेक नसतानाही ऐश्वर्यानं तोडलं `ऑनलाईन` व्रत, Aishwarya broke Karva Chauth fast

अभिषेक नसतानाही ऐश्वर्यानं तोडलं `ऑनलाईन` व्रत

अभिषेक नसतानाही ऐश्वर्यानं तोडलं `ऑनलाईन` व्रत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता अभिषेक बच्चन सध्या इतका व्यस्त आहे तो करवाचौथच्या दिवशीही आपल्या पत्नीसोबत व्रत सोडण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. पण, तंत्रज्ञानाच्या या युगात ऐश्वर्याला अभिषेकची कमी जाणवली नाही तीनं व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअर ‘स्काईप’वरच अभिषेकला पाहून आपलं व्रत तोडलं.

मंगळवारी, अभिषेकची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिनंही इतर स्त्रियांप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवाचौथचं व्रत ठेवलं होतं. एकमेकांजवळ नसूनही अभिषेकनं आणि ऐश्वर्यानं करवाचौथचा सण साजरा केला. अभिषेक सध्या एका सिनेमाच्या शूटींगसाठी बँकॉकमध्ये आहे. करवाचौथच्या निमित्तानं त्यानं ऐश्वर्याशी ऑनलाईन संपर्क केला. हे सर्व पाहून अमिताभ बच्चन यांनीही आश्चर्य व्यक्त केलंय. अमिताभ म्हणतात, या टेक्निकल व्रतामुळे आपण कोणत्या शतकात पोचलो आहोत. आजकाल अंतराचा काहीच अर्थच राहिला नाही.

‘माझ्या पत्नीपासून दूर हा माझा पहिलाच करवाचौथ आहे...’ अशी भावनाही त्यानं ट्विटवरवर व्यक्त केलीय.

अभिषेक आणि ऐश्वर्या २००७मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या जोडप्याला आराध्या नावाची गोड मुलगीही आहे.
अभिषेक आपल्या आगामी चित्रपटासाठी भारताबाहेर गेला आहे. ऐश्वर्या रायसह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी करवाचौथचे व्रत ठेवले होते. मात्र, अभिनेत्री करीना कपूरने आपला या सर्व गोष्टींवर विश्वास नसल्याचे सांगत, व्रत ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 18:13


comments powered by Disqus