Last Updated: Wednesday, February 20, 2013, 14:26
www.24taas.com, नवी दिल्ली ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या हातातून पुन्हा एकदा एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी निसटलीय आणि ही संधी ‘कॅश’ केलीय ‘डर्टी’ गर्ल विद्या बालन हिनं...
अगोदर मधुर भांडारकर आणि आत्ता राजीव मेनन... अभिनयाचा कस पणाला लावणारे रोल मिळाले... पण, ऐश्वर्यानं चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा तिच्या खाजगी जीवनालाच जास्त महत्त्व दिलं. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीव मेनन हे सध्या प्रसिद्ध गायिका एम. एस. सुभलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेसाठी मेनन यांनी ऐश्वर्याला या चित्रपटाची ऑफर दिली होती. पण, ऐश्वर्यानं मात्र त्यावर थंड प्रतिसाद दिला. तिनं चित्रपटात काम करण्यास तसूभरही उत्साह दर्शविला नाही.
ऐश्वर्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटी मेनन यांनी कंटाळून विद्या बालन हिला या चित्रपटाची ऑफर दिली आणि विद्यानं तात्काळ ती स्वीकारही केली. विद्यानं आता हा सिनेमा साईन केलाय.
काही काळापूर्वी, मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ हा महत्त्वकांक्षी सिनेमा स्वीकारून ऐश्वर्यानं तो मध्येच सोडला होता. ती तेव्हा बाळाची प्रतिक्षा करत होती. तिनं सोडलेला ‘हिरोईन’ करीना कपूरला मिळाला आणि करीनानंही त्या भूमिकेला चार चाँद लावले.
First Published: Wednesday, February 20, 2013, 14:26