कमबॅकसाठी अॅशचा वजनावर जोर!, AISHWARYA RAI BACCHAN DECREASING WEIGHT

कमबॅकसाठी अॅशचा वजनावर जोर!

कमबॅकसाठी अॅशचा वजनावर जोर!
www.24taas.com, मुंबई

ऐश्वर्या राय-बच्चन आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यासाठीच तिनं ध्यास घेतलाय वजन कमी करण्याचा...

अभिषेक बच्चन बच्चन आणि ऐश्वर्यानं लोकांना गोड बातमी दिली तेव्हाच तिनं मधूर भांडारकरला चांगलाच धक्का दिला होता. ‘हिरोईन’ या चित्रपटासाठी मधुर भांडारकरने ऐश्वर्या राय बच्चन हिच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, ऐश्वर्याने प्रेग्नंट असल्याची माहिती दिल्यानंतर त्यानं या भूमिकेसाठी करिनाला साइन केलं. आता मात्र, ऐश्वर्याची छोटी आराध्या एक वर्षाची झालीय. त्यामुळे आता बॉलिवूड पुन्हा एकदा ऐश्वर्याला खुनावू लागलंय. तिनं आपल्या बेढब शरिराकडे आणि वजनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केलीय.

सूत्रांच्या माहितीनुसार, फिटनेसवर ऐश्वर्या चांगलाच जोर देतेय. स्लिम आणि सुंदर दिसण्यासाठी हरएक तऱ्हेचे प्रयत्न करतेय. यासाठीच तिनं योगासनही सुरू केलंय. ऐश्वर्याच्या फिटनेस शेड्युलमध्ये वजन घटवण्याचीही नोंद आहे. सध्या, ऐश्वर्यानं तर याबाबतीत चुप्पी साधलीय. पण, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०१३ मध्ये अॅशच्या कमबॅकची घोषणा होऊ शकते. यासंबंधी विविध चित्रपटनिर्मात्यांशीही संपर्क साधणं सुरू आहे. एप्रिल २०१३ मध्ये ऐश्वर्याच्या कमबॅक फिल्मची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, January 5, 2013, 07:42


comments powered by Disqus