सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या आजही चौथ्या क्रमांकावर Aishwarya Rai Bachchan voted fourth most beaut

सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या आजही चौथ्या क्रमांकावर

सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या आजही चौथ्या क्रमांकावर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

हॉलीवूडची बझ नावाची एक वेबसाईट आहे, या वेबसाईटने केलेल्या सर्वेत ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

बॉलीवूडमधून दीपिका पदुकोणचं नाव या यादीत आहे. मात्र दीपिकाचा नंबर २९ वा आहे. मात्र ऐश्वर्याने चौथं स्थान पटकावलं आहे, हे विशेष.

हॉलीवूड बझने दावा केला आहे की, ही यादी ४० लाख लोकांनी दिलेल्या मतांवर आधारीत आहे.

ऐश्वर्या चार नंबरवर आहे, तर ऐश्वर्या आधी या यादीत हॉलीवूडची अभिनेत्री एंजेलीना जोली, केट अप्टन आणि मोनिका बेलचू तिसऱ्या स्थानावर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 31, 2014, 18:54


comments powered by Disqus