Last Updated: Sunday, February 16, 2014, 16:50
24taas.com, झी मीडिया, मुंबई मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.
`कॉफी विथ करण` या कार्यक्रमातल्या एका भागात अभिषेक करणचा गेस्ट बनलाय. हा भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावेळी करननं आपल्या नेहमीच्याच स्टाईलनं अभिषेकला डिवचण्याचा प्रयत्न केला. `जगातल्या सुंदर चेहऱ्याशी... अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर असुरक्षितता जाणवते का?` असा प्रश्न करणनं अभिषेकला केला.
यावर, `मला वाटतं ऐश्वर्या जगासाठी आणि माझ्यासाठीही सर्वांत सुंदर गोष्ट आहे. मी माझा चेहराही दिवसातून अनेकदा आरशात पाहतो... पण, मी आमच्यामध्येच तुलना करत नाही... करूही शकणार नाही. आम्ही एकत्र आहोत त्याचं कारणं आमचं दिसणं मुळीच नाही` असं उत्तर यावेळी अभिषेकनं दिलं.
`ज्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात अशांपैकींच एक ऐश्वर्या आहे... खूप साधी... केवळ मी अभिनेता आहे किंवा मी `बच्चन` आहे म्हणून तिनं माझ्याशी लग्न केलेलं नाही... किंवा मीही ती जगातील सर्वांत सुंदर स्त्री आहे... जगातील सर्वांत वरच्या क्रमांकावर असणारी अभिनेत्री आहे म्हणून मी तिच्याशी लग्न केलेलं नाही` असंही यावेळी अभिषेकनं म्हटलंय... आणि करणची बोलतीच बंद झाली.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी २००७ साली लग्नगाठ बांधलीय... आता त्यांच्या संसाराच्या वेलीवर आराध्या नावाचं फुलंही उमललेलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 16, 2014, 16:47