Last Updated: Friday, May 23, 2014, 16:48
www.24taas,com, झी मीडिया, पॅरिसपॅरिसच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जादू पाहून सर्वच हरखून गेले. मात्र ऐश्वर्या रायच्या आणखी एका कारणासाठी चर्चा होतेय, कारण ऐश्वर्या राय यांनी भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली.
कान्समध्ये मीडियाशी बोलतांना ऐश्वर्या राय म्हणाली, नरेंद्र मोदी यांच्या विजयाने मी आनंदी आणि उत्साहीत आहे की, मी त्यांना कधी देशाचे पंतप्रधान म्हणून पाहणार.
ऐश्वर्याच्या मते मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रचंड प्रगती करेल आणि सर्वांना चांगले दिवस येतील. इंडियात लवकरच इंडिया शायनिंगचे दिवस येतील, असंही ऐश्वर्यानं म्हटलं आहे.
रेड कार्पेटवर नेहमीच ऐश्वर्याच्या नव्या लूकची प्रशंसा होत असते. ऐश्वर्याने मोदींचं कौतुक केल्याने, मोदी फॅन्सनेही ऐश्वर्याचं कौतुक केलंय. ऐश्वर्याचे सासरे महानायक अमिताभ बच्चन गुजरात पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड एम्बेस्डर आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 23, 2014, 16:48