कान्समध्ये अॅशसोबत आराध्याही!, Aishwarya Rai with aaradhya at cance

कान्समध्ये अॅशसोबत आराध्याही!

कान्समध्ये अॅशसोबत आराध्याही!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

६६ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चननं रेड कार्पेटवर हजेरी लावली. यावेळी अॅश कान्समध्ये तिच्या चिमुकल्या ‘आराध्या’सोबत दिसेल असं म्हटलं जात होतं. पण, रेड कार्पेटवर आराध्या काही दिसली नाही. पण, त्यानंतर मात्र एका बाल्कनीमध्ये आराध्याला घेऊन अॅश दिसलीच.

काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केरून कान्सच्या रेड कार्पेटवर चालणाऱ्या ऐश्वर्याबरोबर आराध्या दिसली नाही. या महोत्सवात ऐश्वर्या खुपच आकर्षक दिसत होती. या समारंभासाठी ऐश्वर्यानं याआधी दहा वेळा हजेरी लावलीय.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेल्या ३९ वर्षीय ऐश्वर्यानं एड्स संशोधनाविषयीच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपला मुक्काम थोडा लांबवलाय. या कार्यक्रमादरम्यान एका लिलावात ऐश्वर्या सहभागी होणार आहे. लिलावाद्वारे प्राप्त होणारी रक्कम एड्सविषयी संशोधनासाठी वापरला जाईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013, 13:15


comments powered by Disqus