`अॅश` कान्सच्या रेड कार्पेटवर; अभि म्हणतो..., aishwaryas stunning appearance at cannes floors hubby

`अॅश` कान्सच्या रेड कार्पेटवर; अभि म्हणतो...

`अॅश` कान्सच्या रेड कार्पेटवर; अभि म्हणतो...
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं... हेच तंतोतंत लागू पडतं स्टार जोडपं अभिषेक – ऐश्वर्याच्या बाबतीत... या दोघांच्या लग्नाला आता सात वर्ष पूर्ण झालीत... एवढ्या वर्षांत या जोडप्यामधलं प्रेम सदा बहरतच जाताना दिसलंय.

अभिषेकनं नेहमीच ऐश्वर्याचं कौतुक केलंय. केवळ तिच्या दिसण्याचं नाही तर तिच्यातील टॅलंटचंही... त्यामध्ये तसूभरही कुणाला खिजवण्याचा किंवा कमी लेखण्याचा किंवा मिरवण्याचा भाग कधी दिसला नाही. एक पत्नी म्हणून एक आई म्हणूनही अभिषेकच्या डोळ्यांत ऐश्वर्यासाठी केवळ कौतुकंच दिसलं... यासाठी त्यानं कधीही कोतेपणा केला नाही.

आताही, आपल्या पत्नीचं कौतुक करण्यासाठी अभिषेक ट्विटरकडे वळलाय... त्याला आता ऐश्वर्याचं कौतुक का करावंस वाटलं? असा प्रश्न पडला असेल तर अॅशचा कान्सच्या रेड कार्पेटवरचा हा फोटो पाहा... अभिषेकचंही असंच झालं... त्याला शब्द कमी पडू लागले तेव्हा त्यानं अॅशचा हा फोटोच ट्विटरवर शेअर केला.

‘जवळपास 52 तास झोप नाही... डोळे आपोआप बंद होतायत... आणि समोर मिसेस अशी दिसतेय... ओके... डोळे आता सताड उघडे पडलेत....’ असं अभिषेकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.











* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 14:28


comments powered by Disqus