अजय म्हणतो, ‘फक्त काजोलसाठी...’ , ajay devgan- only for kajol

अजय म्हणतो, ‘फक्त काजोलसाठी...’

अजय म्हणतो, ‘फक्त काजोलसाठी...’
www.24taas.com, मुंबई

अभिनेता अजय देवगण आणि काजोल ही ‘रिअल लाईफ’ जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. पती-पत्नी असलेले काजोल आणि अजय ही जोडी यापूर्वी हलचल, प्यार तो होना ही था, राजू चाचा, दिल क्या करे आणि यू, मी और मैं अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र दिसली होती.

यासाठी अजय विशेष प्रयत्न करतोय. ‘आम्ही काजोलसाठी एका सिनेमाची निर्मिती करत आहोत. पण त्याबाबत अजून या सिनेमात आम्ही एक्रत्र काम करणार आहोत की नाही, यावर मी काही सांगू शकत नाही... आम्हाला एकत्र काम करण्यासाठी एका चांगल्या पटकथेची गरज होती. आम्ही हा सिनेमा फक्त काजोलसाठी बनवत आहोत’ असं फारसा खुलासा न करता अजयनं म्हटलंय. तो प्रसार माध्यमांशी बोलत होता.

योग्य वेळ आल्यानंतर मी आणि काजोल एकत्र काम करणार की नाही याबद्दल आम्ही खुलासा करूच, आम्ही पहिल्यांदा ही खबर तुम्हाला नक्की देऊ, असं आश्वासन अजयनं दिलंय. अजय-काजोल ही जोडी अनेक प्रेक्षकांना फेव्हरेट जोड्यांपैकी एक... त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यास प्रेक्षकांनाही आवडेल, हे नक्की!

First Published: Tuesday, March 5, 2013, 10:16


comments powered by Disqus