अजय देवगणचं दिवसाचं मानधन १ कोटी रुपये Ajay Devgn hikes his price to` one crore per day`

`सिंघम`चं दिवसाचं मानधन १ कोटी रुपये

`सिंघम`चं दिवसाचं मानधन १ कोटी रुपये
www.24taas.com, मुंबई

इतके वर्षं हिंदी सिनेमात कार्यरत असूनही खान मंडळींच्या मांदियाळीत बसू न शकलेल्या अजय देवगणने आता मात्र सगळ्या खान मंडळींना चांगली टक्कर द्यायला सुरूवात केली आहे. बऱ्याच वर्षांपासून काम करूनही अजय देवगण सुपरस्टार बनला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो हिट वर हिट सिनेमे देत सुटला आहे. ऍक्शन फिल्म्ससोबत कॉमेडीही उत्तम प्रकारे करून त्याने आपल्या अभिनयावर बरेच सिनेमे हिट करून दाखवले आहेत. त्यामुळेच आता त्याने आपलं मानधन प्रचंड वाढवलं आहे.

गोलमालचे ३ भाग, बोल बच्चन, आणि सिंघमसारखे सिनेमे १००-१०० कोटींचा बिझनेस करून गेल्यामुले अजय देवगण सध्या सातव्या आसमानात आहे. नकत्याच एका निर्माता दिग्दर्शकाला या गोष्टीचा प्रत्यय आला.

अजय देवगणने आता आपलं मानधन वाढवून रुपये १ कोटी प्रतिदिन या मानधनावर काम करणार आहे. एका सिनेमामध्ये लहानशा भूमिकेसाठी त्याने ७ कोटी रुपये मानधन मागितलं असून हे मानधन त्याला दर दिवशी १ कोटी अशा हिशेबाने हवं आहे.

“मला अजय देवगणने सांगितलं, की तो दिवसाचे १ कोटी या प्रमाणे आठवड्याचे ७ कोटी घेईल. तो पूर्ण सिनेमाचं मानधन घेणं बंद करणार असून, दररोज काम संपल्यावर त्या दिवसाचं मानधन घेणार आहे. हे मानधन दिवसाचे १ कोटी इतकं असेल.” असं या निर्माता-दिग्दर्शकाने सांगितलं.

First Published: Monday, October 22, 2012, 10:18


comments powered by Disqus