Last Updated: Friday, December 27, 2013, 10:28
www.24taas.com, वृत्तसंस्था, पणजीथर्टी फस्ट साजरे करण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात बॉलिवूडमंडळी अवतरणार आहेत. नववर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी बॉलिवूड स्टारमंडळींनी प्राधान्य दिलेय. तसेच अन्य सेलिब्रिटींनीही गोव्याला पहिली पसंती दिली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार आणि सोनम कपूर गोव्यात करणार आहेत एन्जॉय.
नववर्षाच्या स्वागतासाठी या वर्षीही सिने कलाकार सज्ज झाले आहेत. आतापासूनच काहींही गोव्यात थांबणेच पसंत केले आहे. राजकीय नेते, न्यायमूर्ती तसेच वरिष्ठ अधिकारीही गोव्यात न्यू इयर साजरे करणार आहेत. अक्षय कुमार हा कुटुंबवत्सल अभिनेता पत्नी ट्विंकल तसेच दोन मुले आरव आणि नितारा यांच्यासोबत गोव्यात नववर्ष साजरे करील, अशी माहिती देण्यात आली आहे.
अनिल कपूरची बेटी अभिनेत्री सोनम कपूर सध्या राजस्थानमध्ये चित्रीकरणात व्यग्र आहे. तीही गोव्यात येणार आहे. गोव्याला बॉलिवूडस्टार अधिक पसंती देताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर गोव्यात असून २९ पर्यंत त्यांचे वास्तव्य आहे. केंद्रीय वित्त सचिव सुमित बोस, यूपीएससीचे चेअरमन डी. पी. अगरवाल, केंद्रीय थेट कर मंडळ अध्यक्ष सुधा शर्मा, सदस्य दीपा कृष्णा, झारखंडचे मुख्य सचिव आर. एस. शर्मा सध्या गोव्यात दाखल झाले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 27, 2013, 10:28