अक्षयच्या `ओह माय गॉड`ला आमिर खान घाबरला Akshay Kumar makes Aamir Khan undo his work

अक्षयच्या `ओह माय गॉड`ला आमिर खान घाबरला

अक्षयच्या `ओह माय गॉड`ला आमिर खान घाबरला
www.24taas.com, मुंबई

अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या ‘ओह माय गॉड’ने अनपेक्षितरीत्या बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. समीक्षकांनी फारसं या सिनेमाचं कौतुक केलं नव्हतं. मात्र प्रेक्षकांनी हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यापासून डोक्यावर घेतला. या सिनेमात देवभोळेपणावर आणि अंधश्रद्धाळूंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. त्यामुळे हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांना भलताच भावला. याशिवाय यातल्या देवाच्या नावाचा वापर करून पैसे उकळणाऱ्या स्वामी, बाबा लोकांचा खरपूस समाचार घेतल्यामुळे बऱ्याच धार्मिक संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आणि सिनेमा वादग्रस्त ठरू लागला. यामुळे सिनेमाच्या प्रसिद्धीत आणखीनच भर पडली. आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचू लागला.

‘ओह माय गॉड’ सिनेमामुळे जसे देवाधर्माच्या नावाने पैसे उकळणारे स्वामी, बाबा जसे घाबरले, त्यांच्याबरोबरच आणकी एक व्यक्ती घाबरली आहे.. ती व्यक्ती म्हणजे आमिर खान... हा सिनेमा पाहून आमिर खान घाबरण्याचं कारण म्हणजे सध्या आमिर खान करत असलेला सिनेमा ‘पी.के.’ राजकुमार हिरानी दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमाचं कथानक अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’च्या कथेच्या जवळ जाणारं असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळेच आमिर खानने ताबडतोब चित्रपटाचे लेखक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांना ‘पी.के.’ सिनेमाचं पुनर्लेखन करण्यास बसवलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमिर खान आणि राजकुमार हिरानी मिळून करत असलेल्या पी.के सिनेमात देखील स्वामी, बाबांच्या रुपाने देवाधर्माची दुकानदारी करणाऱ्या तथाकथित आधुनिक संतांवर ताशेरे ओढणाऱ्या व्यक्तीची कहाणी रंगवण्यात आली आहे. मात्र, या सिनेमामध्ये आमिर, राजकुमार हिरानी यांनी बरेच पैसे गुंतवल्यामुळे हा सिनेमा वेगळा असावा, याठी पुन्हा स्क्रिप्टचं लेखन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

य़ा सिनेमाचं शुटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. या सिनेमात आमिरसोबत अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपुतही दिसणार आहेत. यापूर्वी ‘कहानी’ सिनेमाच्या कथानकाशी साम्य असल्यामुळे आमिरने ‘तलाश’ सिनेमाचं शुटिंग पुन्हा करायला लावून कथेत बदल करायला लावला होता.

First Published: Thursday, October 18, 2012, 17:53


comments powered by Disqus