मंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी, Akshay Kumar makes khichdi for temple stall owner

मंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी

मंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अक्षय कुमारसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हॉटेलमधल्या कुक पासून सुरू केलेल्या आपल्या करिअरमध्ये आज अक्षय कुमार एक सुपरस्टार बनला आहे. पण अजुनही काही जुन्या गोष्टींवरील त्याचं प्रेम कमी झालेलं नाही. नुकत्याच `बॉस` सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी एका स्लवाल्या माणसाला याचा अनुभव आला.

‘बॉस’ सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी मंदिराजवळ शूट करताना काही मिनिटांच्या ब्रेकमध्ये अक्षय कुमार आराम करण्यासाठी मंदिरातल्या स्टॉलवर गेला. तिथे त्याला एक मुलगा जेवण बनवताना दिसला. चौकशी केल्यावर अक्षयला समजलं, की तो मुलगा डाळ- खिचडी बनवत आहे. ही गोष्ट समजताच अक्षय कुमारने ४० मिनिटांच्या ब्रेकमध्ये त्या मुलाला खिचडी बनवून दिली.

सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या या मदतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉस सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबत आदिती राव हैदारी, शिव पंडीत, रोनित रॉय, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, डॅनी डेग्झंपा हे कलाकार देखील आहेत.

(IANS)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 24, 2013, 16:36


comments powered by Disqus