Last Updated: Monday, October 8, 2012, 18:16
www.24taas.com, मुंबईअभिनेता अक्षयकुमार पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. अहो... म्हणजे मराठी भाषेच्या प्रेमात पडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ या समाजप्रबोधन करणार्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर अभिनेता अक्षयकुमार याला आता समाजावर प्रभाव टाकणारा मराठी चित्रपट काढण्याची तीव्र इच्छा झाली आहे.
बॉलिवूडच्या अभिनेत्यांना आता मराठीची भुरळ पडू लागली आहे. मराठी भाषेचा लहेजा आणि त्यातील खरी गंमत ही आता हिंदीतील मोठमोठ्या नटांनाही आपलीशी वाटू लागली आहे.
लोकांना एखादा चांगला संदेश देण्यासाठी आपली ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’ ही संस्था कार्यरत राहील, असेही त्याने स्पष्ट केले. आपला पुढील चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच विचार करण्यास प्रवृत्त करील, असेही त्याने पुढे स्पष्ट केले.
First Published: Monday, October 8, 2012, 18:08