अक्षय कुमारला अंडरवर्ल्डकडून धमकी, Akshay Kumar threatened by underworld

अक्षय कुमारला अंडरवर्ल्डकडून धमकी

अक्षय कुमारला अंडरवर्ल्डकडून धमकी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या रडारवर आलं आहे. गेल्या महिन्याभरापासून बॉलिवूडच्या तीन सिनेतारकांना अंडरवर्ल्डकडून धमकावलं गेलं आहे. अभिनेता अक्षय कुमारला रवी पुजारी गँगने एका गुप्त कारणावरून धमकावलंय. त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीच्या छायेखाली आलं आहे.

काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमला धमकावण्यात आलं होतं. तर आता निर्माता रामगोपाल वर्माला सत्या २ मधल्या एका डायलॉगवरून छोटा शकीलने धमकी दिलीय. दाऊद अब रिटायर हुआ है, राजन तो कुछ नही कर रहा है, सालेम भी जेल में है असा हा डायलॉग आहे.

अभिनेता अक्षय कुमारला रवी पुजारी गँगने एका गुप्त कारणावरून धमकावलंय. त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीच्या छायेखाली आलंय. अक्षयला तीनवेळा धमकी आली. त्याच्या कार्यालयातर्फे याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 26, 2013, 14:28


comments powered by Disqus