अक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!, Akshay, Twinkle, in search of a dream home In Dubai

अक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!

 अक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!
www.24taas.com , झी मीडिया, दुबई

बॉलिवूड मधलं एक कपल सध्या दुबईत आपलं स्वप्नातलं घर शोधतंय. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल ही जोडी दुबईमध्ये नवं घर शोधत आहेत. त्यांच्या मते मुंबई बाहेर राहण्याचं काम पडल्यास त्यांचं स्वप्नातलं घर तिथं तयार असावं.

दुबईत पत्रकारांसोबत बोलतांना अक्षय म्हणाला, “मी पूर्ण वेळ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इथं व्यस्त आहे, पण माझी बायको मात्र आमच्यासाठी घर शोधतेय.“ अक्षय कुमार दुबईत त्याचा चित्रपट ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’च्या प्रमोशनसाठी आला होता.

दुबई एक जिवंत शहर आहे. आपलं दुसरं घर असल्यासारखं इथं आल्यावर वाटतं. आम्ही इथं अनेकदा येतो. त्यामुळं इथं घर घेण्याचा निर्णय घेतला असल्याचंही अक्षय म्हणाला. अक्षयच्या आधी शाहरुख खान, ऐश्वर्य़ा राय बच्चन, शिल्पा शेट्टी आणि सोहेल खान यांचंही दुबईत घर आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 10:24


comments powered by Disqus