अश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत Akshay-Twinkle in Trouble

अश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत

अश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना अडचणीत सापडले आहेत. कारण या दोघांविरोधात रॅम्पवॉक दरम्यान अश्लील कृत्य केल्याप्रकरणी खटला चालवण्याचे निर्देश हायकोर्टानं पोलिसांना दिलेत.

2009 साली एका फँशन विकदरम्यान रॅम्पवॉक करताना अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानं अश्लील कृत्य केलं होतं. अक्षय कुमार रॅम्पवॉक करत ट्विंकलकडे गेला आणि तिला त्याच्या जीन्सचं बटण उघडायला सांगितलं. याच अश्लील कृत्यासंदर्भात वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती.

त्याप्रकरणी आता अक्षयकुमार आणि ट्विंकलवर खटला चालणार आहे. तर या शोच्या आयोजकांना मात्र या खटल्यातून वगळण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 20:37


comments powered by Disqus