`तणावग्रस्त` आलिया ट्विटरवर व्यक्त!, alia bhat in depression?

`तणावग्रस्त` आलिया ट्विटरवर व्यक्त!

`तणावग्रस्त` आलिया ट्विटरवर व्यक्त!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप तणावाखाली आणि दबावाखाली दिसतेय.

सिनेनिर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची २० वर्षांची मुलगी आलिया हिनं ट्विट केलंय की ‘सध्या मला लोकांपासून दूर ठेवण्याची गरज वाटतेय... मी बाहेरही जात नाहीए... दबाव वाढतोय, असं वाटतंय की आता मी पराभव स्वीकारायला लागलेय.’

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आलियाच्या या ट्विटवरून ती तणावाखाली असल्याचं स्पष्ट होतं असलं तरी यामागचं कारण मात्र तिनं उघड केलेलं नाही. आलिया आगामी ‘हाय-वे’ आणि ‘२ स्टेटस्’ या सिनेमांमध्ये लवकरच दिसणार आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 08:05


comments powered by Disqus