बिकिनी घालण्यात लाज वाटत नाही- आलिया भट्ट Alia feels comfortable in bikini

बिकिनी घालण्यात लाज वाटत नाही- आलिया भट्ट

बिकिनी घालण्यात लाज वाटत नाही- आलिया भट्ट
www.24taas.com, मुंबई

राज, जिस्म, मर्डर सारखे सिनेमे बनवणाऱ्या महेश भट्ट यांची कन्या असूनही आलिया भट्टने करण जोहरच्या कौटुंबिक पठडीच्या सिनेमातून पदार्पण केलं. या सिनेमात तिची भूमिका आणि विशेषतः खुद्द आलिया सगळ्यांना आवडली. मात्र जर तिला जिस्म सारखे सेक्स सीन्स आणि किसींग सीन्सने भरलेले सिनेमे मिळाले, तर ती त्यात काम करेल का, असं आलियाला विचारल्यावर तिने अनपेक्षित उत्तर दिलं.

१९ वर्षीय आलिया भट्ट म्हणाली, "मी किसींग सीन्स, सेक्स सीन्सबद्दल फारसा विचार केला नाहीये. पण जर चांगली स्क्रिप्ट असेल, आणि त्यात आशा दृश्यांची मागणी असेल, तर मी नक्की सी ऑफर स्वीकारेन. मी उगीचच आंगप्रदर्शन करणार नाही. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सिनेमात मी बिकिनी घातली होती आणि मला त्यावेळी अजिबात संकोच वाटला नाही. कारण मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यातही बऱ्याचवेळा बिकिनी घालते. त्यामुळे बिकिनी घालण्यात लाज वाटली नाही."

भट्ट कँपमधील सिनेमांबद्दल विचारलं असता, आलिया म्हणाली, “मी ते सिनेमे पाहाते. पण मला ते सिनेमे फारसे आवडत नाहीत.मला कौटुंबिक छापाचे सिनेमे करणंच सुरक्षित वाटतं.”

First Published: Monday, October 29, 2012, 16:05


comments powered by Disqus