पहा आमीर खानचा हा हटके लूक, Amir Khan New Look

पहा आमीर खानचा हा हटके लूक

पहा आमीर खानचा हा हटके लूक
www.24taas.com, मुंबई

परफेक्शनिस्ट आमीर खानचा नवा सिनेमा म्हटला की प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असतो...मग तो सिनेमाच्या विषयामुळे असो किंवा आमीर खानच्या हटके लूकमुळे असेल... आमीरची अशीच एक फिल्म आहे जी सध्या चर्चेत आहे. मंगल पांडे असो....थ्री इडियट्स असो.... गजनी असो....धोबीघाट असो किंवा अगदी स्मॉल स्क्रीनच्या जाहिराती असो जसा प्रोजेक्ट तसा आमीरचा लूक....आता आमीर असाच नवा लूक घेऊन येणार आहे. खाली पिवळ्या रंगाचा घागरा...

वरती शानदार ब्लेझर आणि गळ्यात हा टान्झिस्टर. हो हो हा आमीर खानचं आहे. आणि त्याचा हा लूक आहे तो आगामी पीके या सिनेमासाठी. राजकुमार हिरानी दिग्दर्शित पीके ही फिल्म एक पॉलिटीकल सटायर आहे. आणि या सिनेमात आमीर खान साकारतो आहे बेवड्याची भूमिका. आणि त्यासाठी त्याने परिधान केला त्याने असा लूक.

राजस्थान मध्ये पार पडलेल्या या शूटींगच्यावेळीच त्याची ही छायाचित्र कैद झाली. हा मात्र आता फक्त आमीर खानचा लूक पाहूनच तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे कारण हा सिनेमा पुढ्च्या वर्षी आपल्या भेटीला येणार आहे.

First Published: Tuesday, March 12, 2013, 16:36


comments powered by Disqus