Amir khan`s photos of Dhoom 3

`धूम-३`चा आमिर खान इंटरनेटवर

`धूम-३`चा आमिर खान इंटरनेटवर

www.24taas.com


‘धूम-३’च्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. या सिनेमात आमिर खान चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. शिकागोमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. शुटिंगदरम्यान काढण्यात आलेले काही फोटो आता इंटरनेटवर झळकू लागले आहेत.

धूम आणि धूम-२ च्या यशानंतर यशराज फिल्म्सच्या धूम-३ शुटिंग सुरू झालं आहे. अमेरिकेमधील शिकागो येथे धूम-३ चं शुटिंग सुरू आहे. या सिनेमात पहिल्यांदाच आमिर खान चमकणार आहे. आमिर खान यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल. बुद्धिमान चोराच्या भूमिकेत आमिर खान काही बाईकवरील स्टंटदेखील करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत उदय चोप्रा आणि अभिषेक बच्चन हे देखील असतील. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हे धूमच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातही होते. पहिल्या भागात जॉन अब्राहमने तर दुसऱ्या भागात हृतिक रोशनने स्टाइलिश चोराची भूमिका साकारली होती.

या सिनेमात आमिर खान पहिल्यांदाच अभिषक बच्चनसोबत काम करणार आहे. याशिवाय सिनेमात आमिर खानच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफही दिसणार आहे. आणिर आणि कतरिना ही जोडीदेखील पहिल्यांदाच सिनेमात दिसणार आहे. यात आमिर खानची स्टाइल नेहमीप्रमाणेच हटके असेल.

First Published: Friday, August 10, 2012, 18:24


comments powered by Disqus