छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आमिरचा नवा सिनेमा!, amir khan unreleased film to release on tv

छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आमिरचा नवा सिनेमा!

छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आमिरचा नवा सिनेमा!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आमिर खानचा सिनेमा सिनेगृहांत झळकल्यानंतर तोबा गर्दी पाहायला न मिळाली तरच नवल... परंतु, आता आमिर खानचा एक नवा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे... पण, या सिनेमाला मात्र सिनेगृहांच्या बाहेर गर्दी पाहायला मिळणार नाही, हे सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच स्पष्ट झालंय. कारण, आमिरचा हा सिनेमा चित्रपटगृहांत म्हणजेच मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

आमिरचा नवा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला तिकीट खरेदी करण्याचीही आवश्यकता भासणार नाही. कारण, पहिल्यांदाच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आणि निर्माता आमिर आपला सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित करणार आहे. हा सिनेमा ‘अँन्ड पिक्चर्स’ चॅनलवर ८ जून रोजी रात्री ८ वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. आमिर खानचा हा खास सिनेमा काही कारणास्तव अजूनही प्रदर्शित होऊ शकला नव्हता.

महत्त्वाचं म्हणजे, हा सिनेमा छोट्या पडद्यावर पाहत असताना जेव्हा जाहीरातींसाठीचा ब्रेक असेल तेव्हा आमिर खान त्याच्या फॅन्सचे कॉलही घेणार आहे. याशिवाय आमिरच्या काही लकी फॅन्सला त्याच्यासोबत हा सिनेमा पाहायचीही संधी मिळणार आहे.

हा सिनेमाबद्दल किंवा या सिनेमांतील कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. म्हणजेच, पडद्याखाली झाकून ठेवलेल्या या सिनेमातून पैसे मिळवण्याचीही पूर्ण रणनिती ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खाननं आखलीय. म्हणजेच, ८ जूनचा रविवार आमिरच्या नावावर असेल यात शंका नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 15:38


comments powered by Disqus