Last Updated: Friday, March 29, 2013, 20:06
www.24taas.com, मुंबईमुंबई १९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाप्रकरणात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्यातील दोषी असलेला अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या नंतर त्याला भेट देण्यासाठी बॉलिवुडच्या कलाकारांची रिघ लागली आहे.
आज सकाळीच मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खान याने संजय दत्तची भेट घेतली. संजय दत्त याला आपल्या परिवाराची खूप काळजी वाटत आहे. त्यामुळे त्याचे जीवलग मित्र असलेले अजय देवगण आणि सलमान खान हे त्याच्या परिवाराची काळजी घेणार आहे. संजूबाबाने हक्काने आपल्या या मित्रांना मान्यता आणि आपल्या तीन मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
तसेच संजूबाबाला आपल्या प्रोडक्शन हाऊसचीही चिंता आहे. आपण जेलमध्ये गेल्यावर हे प्रॉडक्शन हाऊस कोण सांभाळेल याची त्याला अधिक काळजी वाटत आहे. मान्यताला प्रॉडक्शन हाऊसची माहिती नाही. त्यामुळे ती पूर्णपणे ही जबाबदारी सांभाळू शकणार नाही.
First Published: Friday, March 29, 2013, 20:06