सलमान-आमिर एकत्र काम करायला तयार, पण..., amir-salman in film sequel of andaj apna apna?

सलमान-आमिर एकत्र काम करायला तयार, पण...

सलमान-आमिर एकत्र काम करायला तयार, पण...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिनेदिग्दर्शक राजकुमार संतोषी हे सध्या बिझी आहेत ‘अंदाज अपना अपना’च्या सिक्वलच्या तयारीत... हा सिनेमा पुन्हा एकदा नवीन रंगात आणि नवीन ढंगात आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण, 1994 साली मोठ्या पडद्यावर एकत्र दिसलेली आमिर-सलमान ही जोडी सिक्वेलमध्येही पुन्हा दिसणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.

याबद्दलच राजकुमार संतोषी यांनी विचारलं असता... त्यांनी सलमान खान आणि आमिर खान दोघंही सिक्वलमध्ये काम करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं... पण, हे शक्य होईल जेव्हा ते दोघंचं हा सिनेमा बनवतील... अशी पुश्तीही त्यांनी पुढे जोडलीय.

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’चा त्याकाळी बॉक्स ऑफीसवर फारशी जादू चाललेली काही दिसून आली नाही. पण, यातील धम्माल गितांनी आणि डायलॉग्समुळे हा सिनेमा आजही प्रेक्षक उचलून धरतात.

सिनेमाच्या सिक्वलमध्ये सलमान आणि आमिर यांना घेणार का? असा प्रश्न विचारल्यावर संतोषी यांनी उत्तर दिलं... ‘सिक्वलमध्ये सध्याच्या या दोन आघाडीच्या कलाकारांना एकत्र घेणं शक्य नाही... त्याकाळी गोष्ट वेगळी होती... पण, आज ते सिनेजगतातील दोन मोठी नावं आहेत... जर सलमान आणि आमिरनंच हा सिक्वल बनवायला घेतला तरच या दोघांनी मी या सिनेमात घेऊ शकेल’ असं राजकुमार संतोषी यांनी म्हटलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 08:10


comments powered by Disqus