Last Updated: Tuesday, November 20, 2012, 17:57
www.24taas.com, मुंबई बॉलीवूड अभिनेता आमिर खान आपल्या आगामी ‘तलाश’साठी सज्ज झालाय. या चित्रपटात तो एका पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी परफेक्टनिस्ट आमिरनं खऱ्याखुऱ्या पोलिसांकडून टिप्स घेतल्यात.
पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेसाठी आमिर खाननं रात्रीच्या सुमारास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या कामाबद्दल चौकशी केली. ‘तलाश’ या चित्रपटात पोलीसाची भूमिका जोरदार व्हावी, यासाठी आमिरनं स्वत: पुढाकार घेतला. सुर्जन सिंह शेखावत यांच्या या चित्रपटाचं बहुतेक शूटींग सूर्य मावळल्यानंतरच करण्यात आलंय.
एका सूत्राच्या माहितीनुसार, या फिल्मचं महत्त्वपूर्ण शूटिंग रात्री झालं असून त्यावेळी तेथे पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते. आमिरने या पोलिसांकडून त्यांच्या कामाच्या स्वरुपाबद्दल आणि त्यांच्या कामांच्या ठिकाणाबद्दल खडानखडा माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
रिमा कागती दिग्दर्शित `तलाश` या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर आणि रानी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या सिनेमाची कथा कागती आणि झोया अख्तर यांनी लिहिली आहे.
First Published: Tuesday, November 20, 2012, 17:57