अमिरने केले सल्लूचे कौतुक, तो स्टार आहे!, Amirane salluce be appreciated, is the star!

अमिरने केले सल्लूचे कौतुक, तो स्टार आहे!

अमिरने केले सल्लूचे कौतुक, तो स्टार आहे!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये अमिर खान आणि सलमान खान सध्या आघाडीचे अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असली तरी ते एकमेकांचे कौतुक करताना दिसत आहेत. सलमान हा स्टार कलाकार आहे. तो माझ्यापेक्षा मोठा स्टार आहे, अशी कौतुकाची थाप अमिरने मारली.

मुंबईत एका कार्यक्रमात अमिनने सल्लूचे कौतुक केले. या कार्यक्रमात अमिर, सलमान आणि शाहरूखमध्ये स्पर्धा आहे काय, असा प्रश्न विचारला गेला. आमिर खानला त्यांच्या सहकार्यानी चांगले काम केले तर फार आनंद होतो आणि स्टार शक्तीच शक्तीघर म्हणून त्यांने सलमान खानच वर्णन केल आणि प्रशंसा केली.

मला मुळीच स्पर्धा करायला आवडत नाही. मी स्पर्धेच्या नकारात्मक भूमिकेत असतो. त्यासाठी माझ्या आईचे खूप आभार मानतो. मला इतरांबद्दल काही विचारू नका. काही प्रश्न असतील तर ते माझ्या बद्दल विचारा, असे सांगून यावेळी शाहरूखबाबत अमिरने बोलण्याचे टाळले.

मी वास्तव या सिनेमातील संजय दत्तच्या मुन्नाभाई भूमिकेबद्दल खूप आंनदी झालो. तसेच बर्फी या चित्रपटामध्ये देखील रणबीरनी छान काम केले आहे. दरम्यान, याचवेळी त्याने सलमानचे अमिरने कौतुक केले. अमिरची अॅक्शन फिल्म धूम -३ ही याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. याची उत्सुकता अमिरला आहे. सलमान माझा मित्र आहे. त्याचा दबंग बघून मी खूश झालो. त्याला काही करायची गरज नाही. तो असाच डॅशिंग आहे. तो स्टार आहे आणि तो माझा पेक्षाही एक मोठा स्टार आहे. सलमानची जादू अजून कायम राहिल, असे अमिर म्हणाला. मी धूम-३मध्ये काही अॅप्स दाखविलेले नाहीत. मात्र, सलमान या सिनेमात असता तर त्यांने हे दोन्हीही केले असते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 17:45


comments powered by Disqus