Amisha Patel ready for Bold love scenes अमिषा पटेल बोल्ड लव्हमेकिंग सीन्ससाठी तयार!

अमिषा पटेल बोल्ड लव्हमेकिंग सीन्ससाठी तयार!

अमिषा पटेल बोल्ड लव्हमेकिंग सीन्ससाठी तयार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये अयशस्वी ठरलेल्या अमिषा पटेलने आता ‘शॉर्टकट रोमियो’ सिनेमातून जोरदार पुनरागमन करण्याचं ठरवलं आहे. आपलं कमबॅक यशस्वी व्हावं, यासाठी अमिषा प्रत्येक मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे `शॉर्टकट रोमियो`मध्ये अमिषाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत.

या सिनेमात अमिषा प्रथमच नकारात्मक भूमिका साकारत आहे. या सिनेमात ती एका श्रीमंत विवाहीत स्त्रीच्या भूमिकेत आहे. पैशाच्या जोरावर ती आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या माणसाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, असं या सिनेमात दाखवलं आहे.

या सिनेमामध्ये अमिषाने बोल्ड लव्हमेकिंग सीन्स केले आहेत. मात्र हे सीन्स करण्यासाठी अमिषा पटेल आधी तयार नव्हती. दिग्दर्शक सुसी गणेशन याने खूप समजावल्यानंतर अमिषा पटेल तयार झाली. आता अमिषा पटेलच्या बोल्डनेसमुळे शॉर्टकट रोमियो हिट होण्याआधीच हॉट बनला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 19:30


comments powered by Disqus