अमिताभ म्हणतात.. `थकलो रे बाबा` Amitabh Admits he`s tired now

अमिताभ म्हणतात.. `थकलो रे बाबा`

अमिताभ म्हणतात.. `थकलो रे बाबा`
www.24taas.com, फ्लोरेंस

बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांचा करिश्मा आणि त्यांच्यातील ऊर्जा काही औरच आहे. वयाच्या सत्तरीतही आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त ऑफर्स त्यांना येत आहेत. येत्या 2013 मध्ये अमिताभचे 5 सिनेमे रिलीज होत आहेत. मात्र आता आपण थकल्याचं स्वतः अमिताभ यांनीच मान्य केलंय.

अतिकामामुळे अमिताभ बच्चन आता थकून गेले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवर हे मान्य केलंय. यावेळी त्यांनी ट्विट केलंय, की इजल्समध्ये आयोजित केलेल्या माराकेच फिल्म महोत्सवातून परतल्यावर ताबडतोब त्यांना फ्लोरेंस फइल्म फेस्टिव्हलला हजेरी लावत आहे. या फेस्टिव्हलमध्ये माझे अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. खूप प्रवास केला, खूप विमानं बदलली, बराच काळ आकाशात आणि वेगवेगळ्या हॉटेल्सच्या रूम्समध्ये घालवल्यावर आता मला घराची ओढ लागली आहे.

मोरोक्कोमध्ये आयोजित केलेल्या माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हिंदी सिनेमाला शंभर वर्षं झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यासाठी अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन आणि अन्य काही बॉलिवूडकरांसोबत उपस्थित होते. यानंतर सध्या ते फ्लोरेंस येथे आयोजित केलेल्या रिव्हर टू रिव्हर 2012 इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत.

First Published: Tuesday, December 4, 2012, 15:55


comments powered by Disqus