रेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?, amitabh bacchan & rekha coming together with welcome back

रेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?

रेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रेक्षकांना बीग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमामुळे निर्माण झालीय.

गेल्या अनेक वर्षांपासून एकेकाळची मोठ्या पडद्यावरची ही सुपर-डुपर हीट जोडी काही कारणांनी एकमेकांपासून दूरच राहणं पसंत करते. पण, प्रेक्षकांना मात्र अजूनही ही जोडी तितकीच भावते. पण, खाजगी कारणांमुळे आत्तापर्यंत एकमेकांना टाळणारे हे दोन चेहरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या रंगतेय.

दिग्दर्शक अनीस बज्मी आणि निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या आगामी `वेलकम बॅक` या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच होकार दिलाय. आता याच चित्रपटासाठी अभिनेत्री आणि खासदार रेखा यांच्याशी बातचीत सुरू आहे.
रेखा यांनी भूतकाळ विसरून या चित्रपटाला होकार दिला तर अमिताभ-रेखा ही हीट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येईल. या दोघांच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 14:23


comments powered by Disqus