‘मैं अण्णा हजारे हूँ’ म्हणणार अमिताभ! amitabh bacchan in anna hajare`s role

‘मैं अण्णा हजारे हूँ’ म्हणणार अमिताभ!

‘मैं अण्णा हजारे हूँ’ म्हणणार अमिताभ!
www.24taas.com, मुंबई

निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी `सत्याग्रह` या चित्रपटात बीग बी अभिताभ बच्चन आता चक्क ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बीग बींसोबत अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसेल.

‘आरक्षण`नंतर प्रकाश झा आता ‘सत्याग्रह` या चित्रपटाच्या जुळवणीत व्यस्त आहेत. या चित्रपटाची कथा ही सद्य परिस्थितीवर आधारीत असल्यानं हा सिनेमा ‘रिअॅलिटी सिनेमा’ असण्याची शक्यताही वर्तवली जातेय. हा सिनेमाची कथा अण्णा हजारे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या टीमच्या आंदोलनांवर बेतलेली असेल. यातील अण्णांच्या व्यक्तिरेखेची भूमिका बीग बी यांना ऑफर करण्यात आली आणि त्यांनी ती स्वीकारलीदेखील. त्यामुळे अनेक वर्षांनंतर या चित्रपटात अमिताभ दाढी-मिशीशिवाय दिसणार आहे. अमिताभने गेल्या अनेक वर्षांपासून `लकी` समजून ही फ्रेंच दाढी कायम ठेवली होती, पण या चित्रपटासाठी मात्र त्यांना आपली स्टाईल चेंज करावी लागलीय.

First Published: Thursday, October 25, 2012, 23:14


comments powered by Disqus