Last Updated: Wednesday, December 26, 2012, 09:17
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘दक्षिण भारतीय शिक्षा समाजा’तर्फे (एसआयईएस) मिळालेल्या पुरस्कारातील अडीच लाख रुपये दिवंगत पोलीस अधिकारी तोमर यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून जाहीर केलीय.
दिल्ली गँगरेप आंदोलनातील पहिला बळी ठरलेल्या दिवंगत कॉन्स्टेबल सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबीयांना ही मदत देण्यात येणार आहे. इंडिया गेटवर झालेल्या हिसंक आंदोलनादरम्यान तोमर गंभीर जखमी झाले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
बीग बी अमिताभनं या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलंय. तसंच महिलांवर होणाऱ्या अन्यायाला आणि अपराधाला तोंड देण्यासाठी सरकारकडून कायद्यात योग्य असे बदल केले जातील, अशीही आशा ‘बीग बी’ यांनी व्यक्त केलीय.
First Published: Wednesday, December 26, 2012, 09:16