महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली Amitabh Bachchan falls sick, takes a break from work

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

भूतनाथ रिटर्न्स या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांनी मेहनत घेतली आहे.

मात्र याचा प्रकृतीवर परिणाम होऊन, अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे.

अमिताभ बच्चन यांचा सीटी स्कॅन करण्यात आला. सीटी स्कॅनचा रिपोर्ट ठीक असला तरी, डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला अमिताभ बच्चन यांना दिला आहे.

अमिताभ यांनी फेसबुक आणि ट्वीटरवर आपल्या फॅन्सना म्हटलं आहे.

"टेस्ट ठीक आहे, पण छातीत दुखतंय, औषधं घेतोय, डॉक्टरांनी आराम करण्याचाही सल्ला दिला आहे, मात्र कामाबद्दल उत्साह कायम आहे. मी माझ्या तब्बेतीबद्दल तुम्हाला सांगत राहणार आहे."

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014, 12:48


comments powered by Disqus