Last Updated: Tuesday, January 29, 2013, 17:15
www.24taas.com, मुंबईवयाच्या सत्तरीतही अमिताभ बच्चन यांची क्रेझ कायम असल्याचा प्रत्यय नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात सर्वांना आला. अमिताभ बच्चन यांचं चुंबन मिळवण्यासाठी आजच्या हॉट अभिनेत्रींमध्येही चढाओढ सुरू झाली.
या अवॉर्ड फंक्शनमध्ये आयुषमान खुराना याने अमिताभ बच्चन यांना त्य़ांचंच प्रसिद्ध गाणं ‘जुम्मा चुम्मा’वर डान्स करण्याची विनंती केली. यावेळी अमिताभ यांनी म्हटलं, की या गाण्यात आपल्यासोबत नाचण्यासाठी कुणीतरी असायला हवं. ही गंमत चालू असताना अमिताभ यांनी सहज विचारलं, की कुणाला माझा चुम्मा हवा आहे का? यावर प्रेक्षकांमधील अनेक महिलांनी हात उंचावून आपली इच्छा व्यक्त केली. यामध्ये विद्या बालन, प्रियंका चोप्रा, परिणिती चोप्रा, बिपाशा बासू, फराह खान आणि अनुष्का शर्मा अशा हॉट हिरॉइन्सनी देखील आपले हात उंचावले.
याबद्दल ट्विटरवर लिहिताना अमिताभ बच्चन यांनी या सर्व अभिनेत्रींचे आभार मानले आहेत. आजच्या आघाडीच्या हॉट नायिकांनाही अमिताभ यांच्यासोबत जुम्मा चुम्मा गाण्यावर नाचण्यात आणि अमिताभ यांचं चुंबन मिळवण्यात अभिमान वाटत आहे, यावरूनच अमिताभ बच्चन यांच्या जबरदस्त लोकप्रियतेची साक्ष पटते.
First Published: Tuesday, January 29, 2013, 17:15