Last Updated: Friday, March 28, 2014, 12:10
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन अंधश्रध्देचा प्रचार करत असल्याचा आरोप, पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्ताने केला आहे. अमिताभ यांच्याविरोधात तशी न्यायलयाने तक्रार दाखल करून घेतलेय.
महाराष्ट्र प्रतिबंध आणि निर्मुलनच्याअंतर्गत मानवी हत्या आणि इतर अमानुष हत्या, वाईट आणि आघोरी आचरण आणि ब्लॅक मॅजिक कायदा २०१३ नुसार, हेमंत पाटील यांनी बच्चन आणि इतर सहकारी यांच्यावर तक्रार दाखल करण्याची मागणी केलीय. टी.व्हीवर `कॉम्प्लान`च्या जाहिरातीत बच्चन यांनी भूतांचा अभिनय केलाय. यांचसंदर्भात ही तक्रार करण्यात आलीय.
बच्चन यांनी याआधी भूतांची भूमिका `भूतनाथ` मध्ये साकारली होती. याचाच पुढचा भाग `भूतनाथ रिटर्न` लवकरच रिलीज होणार आहे. `जाहिरातमध्ये भूतांचे अस्तित्व आणि त्यावरचा विश्वास, अशा खोट्या समजुती दाखवल्या आहेत. त्यामुळे अंधश्रध्दा वाढण्यास प्रोत्साहन मिळेल असे, पाटील यांनी म्हटलंय.
पाटील यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी नकार दिला. त्याबद्दल मुंबई दंडाधिकारी सीता कुलकर्णी यांच्यासमोर १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 28, 2014, 12:10