Last Updated: Friday, August 2, 2013, 14:17
www.24taas.com झी मिडिया, नवी दिल्लीबिग बी अमिताभ बच्चन यांच्या जावई आणि उद्योगपती निखिल नंदा यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आले. हॅक केलेल्या या मेल अकाऊंटवरून लाखो रूपयांच्या कर्जाची डिमांड करण्यात आली.
निखिल नंदा यांनी आपले ई-मेलचे अकाऊंट हॅक केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दिल्ली पोलीस आर्थिक गुन्हे शाखेमध्ये ही तक्रार नोंदविण्यात आली आहे. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर हॅकरने नंदा यांच्या मित्रांना मेला-मेली केली.
नंदा यांचे जवळचे नातेवाईक लंडनमधील मॅचेस्टरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना पैशाची मदत हवी आहे. त्यामुळे तात्काळ पैसे पाठवावेत, अशी विनंती मेलद्वारे करण्यात आली. अशी माहिती दिल्ली पोलिसांना नंदा यांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 2, 2013, 14:17