'अमिताभ यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे', amitabh bachchan should be president of india - sh

'अमिताभ यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे'

'अमिताभ यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे'
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महानायक अमिताभ बच्चन यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं पाहिजे, असं नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील वैर सर्वांना माहित आहे. शत्रुघ्न सिन्हाने अनेक वेळा अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली आहे

मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी मुंबईत काल रात्री अमिताभ बच्चन यांच्याविषयी अचानक गौरवो्दगार काढले, अमिताभ बच्चन यांना स्क्रीन अॅवार्ड समारोहात, लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते देण्यात आला, त्यावेळी अमिताभ बच्चन यांचं कौतुक करतांना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्री आणि देशाचा गौरव आहेत, त्यांना देशाचं राष्ट्रपती व्हायला हवं."

महानायक अमिताभ बच्चन यांनी आता राष्ट्रपतीपदी विराजमान करा, अशी मागणी अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केलं मात्र त्यांचे संबंध एवढे चांगले नव्हते, शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एकदा जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कारण अमिताभ यांनी अभिषेकच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा यांना बोलवलं नव्हतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 16, 2014, 17:03


comments powered by Disqus