मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे लागतोय ब्रेक- अमिताभ बच्चन, Bachchan worried about Mumbai traffic

मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे लागतोय ब्रेक- अमिताभ बच्चन

मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे लागतोय ब्रेक- अमिताभ बच्चन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे बिग बी अमिताभसुद्धा हैराण आहे. मुंबई कधी थांबत नाही. सतत धावत असते. मात्र याच मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे ब्रेक लागतो असं बिग बीनं म्हटलंय.

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या ‘तलाश इंसान की’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील वाढत्या ट्रॅफिकवर आपली नाराजी व्यक्त केली. बिग बी अमिताभ यांनी ‘तलाश इन्सान की’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं. यावेळी त्यांनी मुंबईतल्या ट्रॅफिकबाबतच्या आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

यावेळी मुंबईतलं ट्रॅफिक रोखणं आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी नाव वापरल्यास हरकत नाही असं बिग बीनं जाहिररीत्या सांगितलं..


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 10:31


comments powered by Disqus