Last Updated: Friday, October 11, 2013, 15:44
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईबॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ७१ व्या वाढदिवशी त्यांना एक सरप्राईझ मिळालं... त्यांची दोन वर्षांची लाडकी नात आराध्या हिनं आपल्या लाडक्या दादूसाठी चक्क हॅप्पी बर्थ डे साँग म्हटलं.
आराध्याची मम्मी ऐश्वर्या राय बच्चन यांनी तिला हे गाणं शिकवलं होतं. आराध्याला आधी वाटलं की, तिचाच बर्थ डे आहे... म्हणून आधी तिनं स्वतःसाठीच हॅप्पी बर्थ डे साँग म्हटलं.. पण तिच्या मम्मीनं प्रॉम्प्टिंग केल्यानंतर तिनं दादूला बर्थ डे विश केलं.
दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी सिने अभिनेता सलमान खानच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्याला जादू की झप्पी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ऐश्वर्या राय आणि सलमानच्या कथित अफेअरमुळं सलमानसोबत बच्चन कुटुंबियांचे संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते. मात्र सलमान मध्यंतरी आजारी असल्याचं समजल्यानं आपण त्यांना भेटलो, असं बिग बींनी स्पष्ट केलंय.
अमिताभ बच्चन यांच्यावर ७१ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अमिताभ यांनी आज पत्रकार परिषद घेत चाहत्यांनाचे आभार मानले. आपल्या वाढदिवसानिमित्त ज्या खेड्यांमध्ये वीज पोहचत नाही त्याठिकाणी सौर ऊर्जेचे दिवे देण्याचा मानस बच्चन यांनी व्यक्त केलाय. हरिवंशराय बच्चन ट्रस्ट आणि उर्जा फाऊंडेशनतर्फे देशातल्या ३००० घरांना सौर ऊर्जेचे दिवे दिले जाणार आहेत.
सचिनच्या निवृत्तीची बातमी ऐकली आणि काही क्षण सर्व काही थांबल्यासारखं वाटलं. हे उदगार अमिताभने सचिनच्या निवृत्तीवर काढलेत. सचिनच्या या निर्णयाने खरोखर धक्का बसल्याचं ते म्हणालेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 15:44