Last Updated: Sunday, October 21, 2012, 10:14
www.24taas.com, मुंबईमॉडेल, व्हीजे आणि अभिनेत्री अमृता आरोरा हिने शनिवारी आपल्या बाळाला जन्म दिला आहे. या संदर्भात अमृताची बहिण मलायका आरोरा- खान हिचा पती अरबाझ खानने माहिती दिली.
“अमृता आणि शकीलला दुसरा मुलगा झाला आहे.. तो खूपच गोंडस आहे.. अभिनंदन!” असं अरबाझ खानने ट्विटरवर ट्विट केलंय. मलायकाने या बातमीला दुजोरा देत, “होय. तिला मुलगा झाला आहे.” असं म्हटलं आहे. मात्र यासंदर्भात इतर कुठलीही माहिती तिने दिलेली नाही.
अमृताने बिझनेसमन शकील लडाक याच्याशी विवाह केला आहे. तिला २०१०मध्येही मुलगा झाला होता. या मुलाचं नाव ‘अझान’ ठेवण्यात आलं. अमृताचा ९वा महिना चालू असताना देखील ती गेल्या आठवड्यात करीना कपूरच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होती. ती सैफीनाच्या संगीत आणि विवाहोत्तर मेजवानीलाही उपस्थित होती.
First Published: Sunday, October 21, 2012, 10:14