जया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर..., An angry Jaya Bachchan misbehaved with media persons

जया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर

जया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आपला राग आवरणं इतकं जड झालं की त्यांनी चक्क एका रिपोर्टरची कॉलरच पकडली...

एका कार्यक्रमासाठी जया बच्चन उपस्थित झाल्या होत्या. इथं त्यांना काही पत्रकारांनी गाठलं. यावर त्यांना एवढा राग आला की त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टरची कॉलरच पकडली. त्या रिपोर्टरनं विचारलेला प्रश्न त्यांना रुचला नव्हता...

नुकतंच, अमिताभ बच्चन यांच्या आतड्याला इन्फेक्शन झालंय आणि जे कँसर असण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच गेल्या काही दिवसांत बीग बींच्या अनेकदा हॉस्पीटलच्याही फेऱ्या वाढल्यात. याचबद्दल रिपोर्टरनं बीग बींच्या प्रकृतीविषयी जया बच्चन यांना प्रश्न केला होता.

पण, जया मॅडमचा पारा एवढा चढला की त्यांनी समोरच्या रिपोर्टरला फैलावरच घेतलं. ‘हा प्रश्न विचारण्याची ही जागा आहे काय? नाही, नाही तुम्हीच सांगा ही काय असे प्रश्न विचारण्याची जागा आहे का?’ असा उलटप्रश्न करत जया बच्चन यांनी ‘माझ्यासोबत जास्त शहाणपणा करू नकोस’ असं म्हणत रिपोर्टरच्या कॉलरलाच हात घातला.

जेव्हा रिपोर्टरनं आणखी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा पारा आणखीनच चढला. ‘मला फक्त याच कार्यक्रमासंदर्भात प्रश्न विचार, ज्यासाठी मी आलेय’ असं त्यांनी म्हटलं पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता त्या तिथून तडक निघून गेल्या.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 15:57


comments powered by Disqus