... आणि प्रियांकाची प्रतिक्षा संपली!, ... & priyanka`s waiting get over

... आणि प्रियांकाची प्रतिक्षा संपली!

... आणि प्रियांकाची प्रतिक्षा संपली!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच प्रयांका चोपडाच्या कुटुंबात आनंदाचा क्षण येतोय... प्रियांकाची कित्येक दिवसांची प्रतिक्षा अखेर संपलीय.

प्रियांकाला तिची वहिणी मिळालीय... कनिका माथूर... मूळची बरेली असलेली कनिका कैंटमध्ये राहते. प्रियांकाच्या आईनं म्हणजेच डॉ. मधू यांनी कनिकाची निवड आपल्या मुलाच्या भावी पत्नीच्या रुपात केलीय.

आपल्या एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसाठी आलेल्या प्रियांकाच्या आईनंच या गोष्टीचा खुलासा केलाय. त्यांचा मुलगा आणि प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोपडा लवकरच पुण्यात स्वत:चा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करतोय. एकदा का या व्यवसायाची आणि सिद्धार्थची गाडी रुळावर आली की लगेचच लग्नाची तयारी करण्यात येणार आहे. हा विवाह सोहळा दिल्लीतच पार पडणार आहे.

फायनान्समध्ये आपलं शिक्षण पूर्ण करणारी कनिका अभय माथूर यांची मुलगी आहे. नुकत्याच झालेल्या नवरात्रौत्वादरम्यान या लग्नाची बोलणी करण्यात आली.

प्रियांकाच्या लग्नासाठी मात्र तीची आई निश्चिंत आहे. प्रियांकाच्या लग्नाबाबत तीच निर्णय घेईल, असंही त्यांनी जाहीर करून टाकलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 26, 2013, 21:26


comments powered by Disqus