अँजेलिना हॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री!, Angelina Jolie highest paid actress in Hollywood

अँजेलिना हॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री!

अँजेलिना हॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री!
www.24tass.com , झी मीडिया, मुंबई

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली नेहमीच चर्चेत असते. मग कारण काहीही असो.. आणि आता तर अँजेलिना जोली हॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री ठरलीय.

फोर्ब्स मॅगझिननं नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेनुसार अँजेलिना हॉलिवूडची नंबर वन ठरलीय. एका चित्रपटासाठी अँजेलिना तब्बल 90 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळंच वर्षाला अँजेलिना जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई करतेय.

मानधनाच्या या शर्यतीत बॉलिवूड अभिनेत्रीही मागे नाहीत. हॉलिवूडच्या तुलनेत त्यांच्या मानधनाचा आकडा कमी असला तरी. सध्या बॉलिवूडमध्ये प्रियांका आणि कतरीनामध्ये चढाओढ असल्याचं म्हटलं जातंय. जंजीर सिनेमाच्या रिमेकसाठी प्रियांकानं तब्बल 9 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. रिमेकमध्ये प्रियांकानं गाणं म्हटलं म्हणून प्रियाकांनं आपला भाव वाढवल्याचं म्हटलं जातंय.

प्रियांको सोबतच कतरीना कैफही या शर्यतीत मागे नाहीय. आजपर्यंतच्या कतरीनाच्या हीट चित्रपटांची यादी पाहता कतरीनाच नंबर वन असल्याची चर्चाही एकीकडे रंगतेय. एकूणच काय तर हॉलिवूडमध्ये अँजेलिनानं आपणच बेस्ट असल्याचं सिद्ध केलं असलं तरी बॉलिवूडमधली अभिनेत्रींची चढाओढ सुरुच आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 5, 2013, 16:02


comments powered by Disqus