अनुष्का शर्माच्या कारची किंमत कोटीत, Anushka Sharma new luxury car

अनुष्का शर्माच्या कारची किंमत कोटीत

अनुष्का शर्माच्या कारची किंमत कोटीत
www.24taas.com,झी मीडिया ,मुंबई

`रब ने बना दी जोडी` या हिंदी चित्रपटामधून स्टार झालेली अभिनेत्री अनुष्का शर्माने आलिशान कार खरेदी केलेय. ही कार घेतल्यानंतर तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

अनुष्काचे चित्रपट फ्लॉप झाले असले तरी ती नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. मीडियाकडून आपली दखल घ्यावी यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. आता तिने आलिशान गाडी घेऊन आपली प्रतिमा उंचावण्याचे कसब दाखवून दिले आहेत. सध्या ती चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिने रेंज रोव्हर ही आलिशान कार खरेदी केली आहे. त्यासाठी तिने १.५ कोटी रुपये मोजले आहेत.


अनुष्काच्या मुंबईतील बांद्रा परिसरातील घरात नवीन कोऱ्या रेंज रोव्हर कारसोबत तिची काही छायाचित्रे फोटोग्राफरने क्लिक केलीत. यावेळी ती खूश होती. हातात रिमोट घेऊन गाडीची दारेही बंद करून घेतली. तर थम उंचावून आपण आनंद असल्याचे दाखवून दिले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 10:36


comments powered by Disqus