अनुष्काकडून सलमान खानची तारीफ, Anushka Sharma Salman Khan`s praise

अनुष्काकडून सलमान खानची तारीफ

अनुष्काकडून सलमान खानची तारीफ
www.24taas.com,मुंबई

बॉडीगार, दबंग या चित्रपटाचा नायक सलमान खान याचे गुणगान अभिनेत्री अनुष्का शर्मा गात आहे. अनुष्काने तारीफ करण्यास सुरूवात केल्याने बॉलिवूडमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे.

बॉलिवूड आणि छोट्या पड्यावर सलमान खानची चलती आहे. ही चलती कॅच करण्यासाठी अनुष्का शर्माने नविन फंडा अवलंबिला आहे. ती सध्या सल्लूची तारीफ करण्यात गुंग आहे.

मटर की बिजली का मंडोला या चित्रपटातील बिलजीच्या भूमिका साकारणाऱ्या अनुष्का शर्माचा कॅंपबाजीवर खूपच विश्वास असल्याचे दिसत आहे. रब ने बना दी जोडी रिलीज झाल्यानंतर ती शाहरूखचे गुणगान गात होती. आता तर सल्लू मियाँचे गुणगान गाण्यास सुरूवात केली आहे. एक था टायगर आणि आता दबंग-२ च्या रिलीजनंतर मात्र अनुष्का सलमानची प्रशंसा कताना दिसत आहे.

एक था टायगरच्या यशानंतर सलमान यशराज बॅनरसोबत आणखीन काही चित्रपट करण्याची शक्यता आहे. तशी अनुष्काला खात्रीही आहे. त्यामुळे सलमानची मर्जी संपादन करण्यासाठी आणि आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्यासाठी सर्व धडपड असल्याचे दिसतेय.

सलमानने शब्द टाकला तर सल्लू बरोबर काम करण्याची संधी मिळेल, अशा आशेवर अनुष्का आहे. तसेच सलमान खान म्हटला की, हिट चित्रपट असेल. सध्या अनुष्का राजकुमार हिराणीच्या पीके आणि अनुराग कश्यप यांच्या बॉम्बे वेल्वेट या चित्रपटात काम करीत आहे.

First Published: Thursday, January 17, 2013, 15:32


comments powered by Disqus