आजोबा बिग बींच्या पार्टीत आराध्या दिसली, Aradhya makes her debut on stage at grandpa Amitabh birthday b

आजोबा बिग बींच्या पार्टीत आराध्या दिसली

आजोबा बिग बींच्या पार्टीत आराध्या दिसली
www.24taas.com, मुंबई
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत प्रथमच अभिषेक आणि ऐश्वर्या यांची लाडकी बेबी आराध्या जगासमोर आली. जन्म झाल्यापासून बच्चन कुटुंबियांनी आराध्याला मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते.

या पार्टीला बॉलीवुडचे दिग्गज कलाकार, राजकारणी आणि नोकरशहा असे एकूण ८०० जण उपस्थित होते. शाहरुख खान, करण जोहर, रजनीकांत, माधुरी दीक्षित आणि इतर बड्या स्टार मंडळी उपस्थित होत्या.
आजोबा बिग बींच्या पार्टीत आराध्या दिसली

आराध्याचे हे प्रथम स्टेज पदार्पण होते. सुमारे ८०० जणांच्या या पार्टीत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बेबी आराध्याचं बनली होती. आपल्या आजोबाच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बी ऐवजी सर्वांच्या नजरा आराध्यावर खिळल्या होत्या. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीचे हे जीवनातील पहिली स्टेज एन्ट्री होती आणि या एन्ट्रीमध्ये तीने आपले पदार्पण सार्थ ठरवले. सर्व पाहुणे या छकुलीची एक झलक पाहण्यासाठी आसुसले होते. बर्थ डे केक कापताना बच्चन कुटुंबियांसोबत क्रीम कलरच्या फ्रॉकमध्ये बेबी बच्चन आपल्या आईसोबत उपस्थित होती. आता आराध्या ११ महिन्यांची झाली आहे.

सौजन्य - ट्विटर

First Published: Thursday, October 11, 2012, 14:37


comments powered by Disqus